म, अ किंवा आ शेवटी किंवा उपान्‍ती असल्यास मत्‌ चे वत्‌ होते.  कचटतप या वर्गातल्या पहिल्या चार अक्षऱांपुढे मत्‌ आल्यास त्याचे वत्‌ होते.

या संदर्भात पाणिनीची तीन सूत्रे आहेत. १. तदास्यास्ति‌ अस्मिन्‌ इति‌ मतुप्‌ । रसादिभ्यश्च ।..(पाणिनी ५.२.९४,९५)मत् हा प्रत्यय (जे आहे ते ह्यांत आहे) स्वामित्व किंवा (रसादिभ्यश्च)गुणदर्शक आहे.  २.  मादुपधायाश्च मतोर्वोऽयवादिभ्यः । (पाणिनी ८.२.९) मत् हे उपधायाचे(उपान्त्य वर्णाला लागून) नामाचे विशेषण करते. मतोर्वोः (म, अ, आणि आ) शेवटी असले की मत् चे वत् (वादिभ्यः) होते.

 संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांत हा नियम अनवधानाने का होईना, पाळला जातो.  संस्कृतातच या नियमाला काही मोजके अपवाद असल्याने मराठीत असले तर आश्चर्य नाही.  वर्धमान-नशेमान-अपमान मधले मान, अस्मत्-किस्मत मधले मत् आणि फारसी शब्द, दरबान-बागवान मधले बान/वान हे पूर्णतः वेगळे आहेत; त्यांची येथे गल्लत होण्याचे कारण दिसत नाही.