मला वाटते, आपण जे म्हटले आहे ते अगदी योग्य आहे. केवळ दृष्टिकोणाचा फरक आहे. चर्चा प्रस्ताव उपरोधिक आहे हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही.
समाजात होणाऱ्या बदलांना त्या त्या वेळी बराच विरोध होतो. ह्या बदलामुळे संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे अशी बोंब उठत राहते. प्रत्यक्षात या बदलांमुळे दूरगामी चांगले परिणामच झालेले दिसतात किंवा संस्कृतीला बळकटी येते किंवा एखादा नवा पायंडा पडतो. संस्कृतिहनन वगैरे काही होत नाही.
समाजातील अशा बदलांवर थोड्या मिस्कीलपणे ही चर्चा हॅम्लेट यांनी सुरू केलेली आहे असे मला वाटते.