श्रावण मोडक यांच्याशी एका बाबतीत सहमत आहे.

शुद्ध मराठी यांनी दिलेला व्युत्पत्तिजन्य अर्थ अगदी योग्य आहे. मात्र या अर्थाने हा शब्द आजच्या काळातल्या शेतीव्यतिरिक्त भाषेत वापरला जात नाही हेही तितकेच खरे आहे. शिवाय शुद्ध मराठी यांनी जरी हा प्रगल्भ विचार केलेला असला तरी घोषणा बनवणाऱ्याने तो केलेला असेल असं काही मला वाटत नाही. तिथे हा प्रयोग नायनाट / नाश या अर्थानेच झालेला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अर्थदृष्ट्या घोषणा ठीक आहे. शब्दरचना जरा मजेशीर आहे इतकंच!

असो. श्रावण, बीमोड म्हणजे जमीन पुन्हा तयार करणे असे जरी पर्यायाने होत असले तरी मुळात पेरलेले बी वाया जाणे अर्धवट पीक समूळ उपटावे लागणे, आणि त्या हंगामाकरिता हातावर हात धरून बसावे लागणे या गोष्टी वाईट आहेतच. आणि हा पिकाचा बीमोड असतो. जमिनीचा नव्हे. जमिनीचा बीमोड म्हणजे जमिनीचं बीज (अस्तित्व) नष्ट होणं असा अर्थ होईल. असा बीमोड टाळावा म्हणून वृक्षतोड नको असे म्हणणं आहे घोषणाकाराचं. आपल्या प्रतिसादाने थोडी गोंधळात पडले होते. त्यावर हे भाष्य आहे.