मध्यरात्री सोसायट्यांच्या सेक्रेटऱ्यांना उठवून वर्णनानिशी पत्ता शोधणे म्हणजे धन्य काम आहे.
माझी एक मैत्रिण लंडनहून केंब्रिजला अशीच पत्ता शोधत आली होती ते आठवले. तिने एका घरात बियर पीत टीव्ही बघत बसलेल्या (अर्धवट शुद्धीतल्या) मंडळींना असेच माझे वर्णन सांगून घर शोधण्याचा प्रयत्न केला होता. 'त्याकाळी' माझा मोबाईल मूर्छित झाला होता त्यामुळे ही वेळ आली होती.