![]() |
आमच्या संकेतस्थळाचे विशेष म्हणजे काही मान्यवरांकडून चालवली जाणारी सदरे. त्यापैकी काही प्रमुख सदरांची थोडक्यात कल्पना येथे मांडत आहोत.
ठमाकाकूंचा सल्ला : वाचकांनी विचारलेल्या इरसाल प्रश्नांना ठमाकाकू त्यांच्यापरीने उत्तरे देतात. ठमाकाकूंना कोणत्याही विषयाशी वावडे नाही पण कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यायची हे स्वत: ठमाकाकू ठरवतात. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी निरोपाने ने ठमाकाकूंना ते प्रश्न विचारावेत. प्रश्नकर्त्याला आपले नाव जाहीर करायचे नसल्यास त्याने तसे प्रश्नापुढे लिहून कळवावे. आठवड्यातून एकदा ठमाकाकू त्यांना आवडलेल्या २-३ प्रश्नांची उत्तरे देतील.
नशिबाचे भोग : सुप्रसिद्ध ज्योतिषी प्रा.डॉ.वि.धि.लिखिते यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पळून जाऊन हिमालयात घोर तपश्चर्या केली. असे म्हटले जाते की साक्षात ब्रह्मदेव त्यांच्यापुढे उभे ठाकले आणि ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे यांचे ज्ञान लिखित्यांच्या झोळीत घालून गेले. आमच्या संकेतस्थळावर येऊन आठवड्याचे भविष्य लिहिण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
पाकिस्तान: सर्वत्र प्रकाशित होणार्या चविष्ट पाककृती वाचून कंटाळलेल्यांना आपली अचाट कल्पनाशक्ती वापरून नाविन्यपूर्ण पाककृती प्रकाशित करायच्या असतील तर आमच्या संकेतस्थळावर करता येतील. आठवड्याला एक नवीन पाककृती संकेतस्थळाकडून प्रकाशित केली जाईल.
माकडाच्या हाती...: एखाद्या नव्या लेखकाला आमच्या संकेतस्थळावर लिहिण्यास उद्युक्त करण्याची कल्पना साक्षात मनुष्य पितामहाच्या रुपाने साकार होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. "आधीच मर्कट" असे सुप्रसिद्ध वचन असले तरी मद्य न पिताही केवळ लेखणीच्या जोरावर बजबज माजवण्याची क्षमता या मर्कटराजांमध्ये आहेत. तर अशा या मर्कटोत्तमाचे हात जेव्हा केळी सोलण्यात मग्न नसतात तेव्हा लेखणी हातात धरून माणसाच्या या पूर्वजाने आमच्या संकेतस्थळावर वाचकांना कोलांट्या उड्या मारायला लावतील असे लेख देण्याचे कबूल केले आहे.
याखेरीज, काही मान्यवरांकडून खुसखुशीत साप्ताहिक सदरे, चर्चांचे गुर्हाळ, गद्य आणि पद्य विभागही संकेतस्थळावर आहेतच. विनोदी लेख, कथा, विचार, अनुभव, कविता, विडंबने यांना इथे प्रसिद्धी दिली जाईल.
तर मंडळी, आमच्या संकेतस्थळाचे सदस्यत्व घेण्याचे आमंत्रण या निवेदनातून देत आहोत. बजबजपुरीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
आपले स्नेहाभिलाषी,
प्रशासन,
बजबजपुरी.कॉम
डिस्क्लेमर १: इतर कोणत्याही संकेतस्थळांशी आमची स्पर्धा, मैत्री किंवा वैमनस्य नाही याची नोंद घ्यावी.
डिस्क्लेमर २: गंभीर स्वरुपाचे लेखन या कट्ट्यावरून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय काढून टाकले जाईल. व्यक्तिगत स्वरुपाचे लेखन ठेवावे की नाही हा निर्णय बजबजपुरी प्रशासनावर राहिल.
डिस्क्लेमर ३: या कट्ट्यावर प्रसिद्ध झालेल्या लेखनावर विश्वास ठेवण्याची जबाबदारी वाचकांची आहे. बजबजपुरी प्रशासनाने जाहीर केल्यानुसार संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या विचारांशी बजबजपुरी प्रशासन सहमत असेलच असे नाही.
एक विशेष सूचना : संकेतस्थळ सध्या पाहण्यासाठी उपलब्ध आहे. काही कामे अद्याप सुरु आहेत. परंतु, लवकरच जोरात सुरु होईल याची खात्री बाळगावी.
आमचा पत्ता: दुवा क्र. १