मित्रानो
नववर्षाचे औचित्य साधून मी एक नव्या संकेतस्थळाचा श्रीगणेशा करत आहे.
नाव- 'छानसे वाचलेले'
या संकेतस्थळाचा पता हा आहे.
दुवा क्र. १

या संकेतस्थळाबद्दल थोडेसे-
आज आपण सर्व जण मनोगत सारख्या ठिकाणी वावरतो. लेखकांचे लेखन वाचतो, त्यावर चर्चा करतो आणि साहित्याचा आस्वाद घेतो.
पण महाराष्ट्राचा भव्य परंपरेला अनुसरून अनेक जुन्या लेखकानी देखील मराठी साहित्य विश्व सम्रुद्ध केलेले आहे.
नवे वाचताना त्यांचाही विसर पडून चालणार नाही.
आज बहुतेकदा इंटरनेटचा वापर होत असल्याने पुस्तक वाचन कमी झालेले आहे तेच लेखन जर जालावर उपलब्ध असेल तर ते वाचायला सोयीचे होते.
यातील काही लेखन आज जालावर उपलब्ध आहे मात्र ते फारसे कोणाला ठावुक नाही.
याशिवाय प्रत्येक लेखकाचे संकेतस्थळ वेगळे आणि सापडण्यास अवघड आहे. त्यामुळे तिकडे लक्ष कमी प्रमाणात जाते.
यावर उपाय म्हणजे हे संकेतस्थळ होय
येथे आपणास नामवंत लेखकांचे लेख वाचता येतीलच त्याशिवाय त्यांचे सर्व लेख कोठे उपलब्ध आहेत त्याचा धागाही दीलेला आहे. याचा आमच्यासारख्या तरुणाना वा परदेशवासियाना खुप फायदा होवू शकतो. याशिवाय ऑर्कुट सारख्या ठिकाणी वा इ-पत्रातून आपणास अएक चांगला मजकुर वाचावयास मिळतो मात्र नंतर तो स्म्रुतीतून निघून जातो अशा लिखाणालाही येथे संधी दीलेली आहे.
तर मित्रानो,
गजाननाच्या कृपेने आणि आपल्या आशिर्वादाने हा उपक्रम सुरू करत आहे.
त्याला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.
आपण हे संकेतस्थळ पाहा वाचा आणि कसे वाटते ते तेथेच वा
दुवा क्र. २ येथे इ पत्राने कळवा.
सदरचे स्थळ हे मोफत असल्याने काही त्रुटी आहेत. त्या लवकरच काढल्या जातील.
तर मित्रानो पाहा, वाचा आणि बिनधास्त बोला.
आपला
(उपक्रम यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करणारा) विनायक
धन्यवाद