सन्मित्र मेळविण्या,

असती उपाय सोपे,

विसरू नकाच काही,

 ध्यानी धरा बरे हे!

पोटी असो जिव्हाळा,

रसने मधुर भाषा,

ओठात हास्य-रेषा,

अंगी विनोद बुद्धी!

माथा हळूच झुकवा!

थोडीच झिज सोसा,

विसरा जरा स्वतःला,

मग जमेल मित्रमेळा!

शत्रू न कोणी माझा,

शत्रू नसे कुणा मी,

'शत्रुबुद्धी'च नष्ट होवो,

ही प्रार्थना सदाची!

मित्राविना मुळीही'

जगी सौख्य नांदते ना!

सुख-दुःख वाटण्याला,

मज हवाच मित्र मेळा!