बर, चला, हा मुद्दा हास्यास्पद तर हास्यास्पद!
तरी उत्तरे देणे माझे कर्तव्य आहे.
१. सन्माननीय मृदुलाजी - साडीवरील पोलक्याच्या लांबीबाबत माझे काहीही मत नाही. कारण ती लांबी 'नसलीच' तरी फारसे काही बिघडत नसावे. ( निदान स्त्रियांचे तरी काही फारसे बिघडताना दिसत नाही. ) मी ज्या 'शॉर्ट टी शर्ट' बाबत बोलत आहे त्याच्या वापरामुळेही तसे काही बिघडल्याचे अजून जाहीर झालेले नसावे. पण ते डोळ्यांना सवयीचे नाही व फारच धीट वाटते म्हणून लिहीले.
२. माननीय हॅम्लेट - आपल्याला ज्या चित्राची आठवण झाली ते पाहून मलाही हसू आले. चांगला वाटले.
३. माननीय कोलबेर - आपल्या वयाबाबत व वास्तव्याच्या ठिकाणाबाबत मला माहिती नसल्यामुळे नेमक्या कोणच्या गोष्टी शॉर्ट टी शर्ट मुळे दिसतात हे सांगणे मला अयोग्य वाटत आहे. तसेच त्या गोष्टी आपण म्हंटल्याप्रमाणे 'असामाजिक' नसून 'त्या झाकणे समाजामध्ये आवश्यक समजले जाते' असा माझा मुद्दा आहे. आता या आवश्यकता कुणाला भासाव्यात अन कुणाला भासू नयेत यावर अर्थातच माझे नियंत्रण नाही.