....अर्थातच  सद्‍गुणांचा उदो, उदो. दोषांचा हाय, हाय. कोणी, तोंडाने बोलतो, गातो, विचार व्यक्त करतो. कोणी, हावभावा द्वारे, कोणी लेखणीने, कोणी बॅटीने, कोणी गोलंदाजीने, कोणी कृतीने. प्रत्येकाला [निरपेक्ष व्यक्ती सोडुन] त्याच्या, बोलण्याची, लिहीण्याची, बॅटींगची, गोलंदाजीची इतरांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याची सुप्त किंवा प्रगट इच्छा / अपेक्षा असते. त्या प्रतिसादा शिवाय, क्रिया कर्त्याच्या प्रयत्‍नांचे  / उद्देशांचे रास्तिकरण /रास्तता सिद्ध होणे [व्हॅलिडेशन होणे ] अपुर्ण राहते.  क्रिया-प्रतिक्रिया यांचे सतत आपल्या मेंदुमध्ये नोंदणीकरण चालुच असते. मागच्या, जास्त वारंवारीत ,नोंदित क्रिया-प्रतिक्रिया नुसार,    मेंदू पुढील कर्तव्य / अकर्तव्याची निश्‍चिती करत असतो. त्यासाठी, सद्‍वर्तनाचे   सुदृढिकरण [रि‌इंफोर्समेंट ] / विशेष मजबूतीकरण करण्यासाठी,  सकारात्मक प्रतिक्रिया, प्रतीसाद  आणि दुर्वर्तनाप्रती [दुर्वर्तनाचे खच्चिकरण करण्यासाठी]  --नकारात्मक प्रतिक्रिया, प्रतीसाद दिल्याने योग्यायोग्य जाणून विवेकात्मक  वर्तनाची शक्यता फार वाढते.

त्याचसाठी, "कॅरट ऍंन्‍ड स्टिक", अनेक पिढ्यांपासून आजही उत्तम काम करते.

पण त्याच बरोबर प्रत्येकाची कॅरट व स्टिक ही वेगवेगळी, हे सुद्धा लक्षात ठेवावे.

लेख फारच उत्तम, चालू द्या, आम्ही अहोत तुमची स्तुती करायला.

आम्ही फक्त वाचून, प्रतिक्रिया राखून ठेवणारे मुत्सद्दी / अरसीक नाही.