हा चर्चा प्रस्ताव हास्यास्पद का वाटावा?
मला तरी भूषणचे मुद्दे पटतात. जरी आचार-विचार स्वातंत्र्य असले, तरीही कुणीच व्यक्ती कमरेचं सोडून डोक्याला जसे गुंडाळीत नाही, तसेच आपण कितीही तथाकथित 'प्रगत' असल्याचं दाखवायचं म्हटलं, तरी सुद्धा आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा विचार करूनच आपले पेहराव निवडणार असं निदान मला तरी वाटतं.
(काहींनी नक्की काय दिसतं हो? अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तो शुद्ध आंबटशौकीनपणा वाटतो)