अनेकदा मुली मागे बसत असतात तेंव्हा आसनाची स्थिती त्यांना बरेच पुढे झुकवित असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे जे दृश्य आपण ( त्यात सर्वच आले) टाळत असतो ते दिसत असते. त्याचबरोबर अनेक मुले-मुली लगट करून बसलेले असतात.

आता अशा गोष्टी बऱ्याच सापेक्ष असतात त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार / प्रतिसाद येणारच.

अरेबियन नाईटमध्ये एखाद्या सर्वांग झाकलेल्या मुलीचे पायाचे नख पाहताच उत्तेजित भावना निर्माण झाल्याचे वाचल्याचे आठवते. त्यामूळे पेहराव आणि समाजाच्या सर्वसाधारण प्रतिक्रिया याचा मेळ घालणे अवघड आहे.

तरीपण आपण हा लेख लिहिला आणि उलट सुलट प्रतिसाद आलेतरी त्याचे वाईट वाटून घेऊ नये.