भूषणने  मांडलेला मुद्दा योग्य आहे. तोडके कपडे बघितलेली मुलगी बघितल्यावर "तसला" विचार येणे किंवा त्या नजरेने बघणे, हे नैसर्गिक आहे. त्यात आंबटशौकिनपणाचा प्रश्न नाही. ते नैसर्गिक आकर्षण आहे. तसे ज्या पुरुषाला वाटत नाही तो कसला पुरुष?

(या विषयावर व. पु. काळेंचे निवडक वपुर्झा वाचावे. त्यात या विषयाचा छान परामर्श त्यांनी घेतलेला आहे. तसेच पु̮. ल. देशपांडेंचे वाक्य आठवा. )

पण, अंगप्रदर्शन किती, कसे, केव्हा, कुठे, कुणासमोर करायचे यालाही लिमिट असते.

राहिला प्रश्न तोडक्या टि शर्टस चा! भूषण म्हणतो/म्हणतात ते बरोबर आहे. काही वेळेस अशा मुली जेव्हा खाली वाकतात, तेव्हा असा टी शर्ट नको तेच उघडे करतो. यात बघणाऱ्या कुणालाही 'तसले' काही वाटण्या ऐवजी, ओंगळवाणेच वाटते. अशा मुलींना दोन चार शब्द मोठ्या जाणकार वडिलधाऱ्या मंडळींनी नक्की सुनावले पाहिजेत, असे मला वाटते.

मुलींनाच आजकाल अंगप्रदर्शन करायला आवडते. आपली पूर्ण फिगर नीट सगळ्यांना दिसावी याची काळजी घेण्यासाठी, ते शक्य तेवढे फिट कपडे घालतात. आजच्या जागतिकीकरणाच्या लाटेत फॅशन क्षेत्रात, सिनेमात  व इतर सगळ्याच ठिकाणी फिगरला अवास्तव महत्त्व आलेले आहे. त्यामुळे चेहेरा जरी (प्रदुषणामूळे नाईलाजाने किंवा काहीवेळा ओळख लपवण्यासाठी)झाकलेला असला तरी मुलींना ("सगळ्याच" की फक्त "काही मुली" याबाबत मतभेद असू शकतात) आपली फिगर मात्र सगळ्यांनी पाहावीच असेच वाटते.

त्यातल्या त्यात मी असेही बघितले आहे की (भूषणला हे माझा मुद्दे नक्की पटतील) -

            तेव्हा, कडाक्याही थंडी असतानाही असे कपडे घालणे याचा अंगप्रदर्शन करणे हा उद्देश नसेल तर दुसरा काय असतो?

      असे काही बघितले तर काही साध्या मुलींच्या सुद्धा अशा मुलींबद्दल तिखट प्रतिक्रिया असतात, हे मी अनुभवले आहे.