सर्वांचेच धन्यवाद! माझ्या क्षमतेप्रमाणे उत्तरे देत आहे.
१. कोलबेर यांचा प्रश्न - दृश्य टाळतो की आपल्याबाबतीत असे होणे टाळतो? - परत सांगावेसे वाटते की आपण कुठे असता ते माहीत नसल्यामुळे आपल्याला यात काही वावगे वाटत नाही यात काही वावगे वाटू शकत नाही. आपल्या आणखीन एका प्रश्नाचेही उत्तर याच मुद्द्यात देत आहे. समजा आपण अमेरिकेत राहत असलात जिथे 'सनबाथ घेण्यासाठी स्त्री-पुरुष अर्धनग्नावस्थेत समुद्रकाठी पहुडलेले असतात अन तिथे कुणीही वावरू शकतो', तर आपल्याला 'शॉर्ट टी शर्ट मधून भारतीय मुलींचे काही शरीर समाजातील कुणालाही दिसू शकणे' ( असे भाग जे सहसा आपल्या समाजातील स्त्री झाकायच्या वृत्तीची असते ) यात काहीच वावगे वाटणार नाही. हे झाले स्पष्टीकरण माझ्या 'आपले वास्तव्य' या मुद्द्याचे! मी आणखीही एक मुद्दा मांडला होता की आपले वय काय ते माहीत नाही. कारण 'स्त्रीचे नक्की कुठले अवयव दिसतात' हा आपला प्रश्न, जो आपण दोनदा किंवा अधिक वेळा विचारलेला दिसतो, ( काहीही वैयक्तिक समजू नका ) मला असा अंदाज करायला भाग पाडतो की एक तर आपण अजून प्रौढ तरी नाही आहात, आपण अतीप्रौढ आहात किंवा आपण 'ते जाणण्यास अतीउत्सूक' आहात. प्रश्न खेड्यातील अन परदेशातील लोकांना वेगळे दिसते का असा नसून कुठे काय स्वीकारले जाते अन स्वीकारले जात नाही याचा आहे.
२. शुद्ध मराठी यांचा मुद्दा - ज्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही तिकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न! ठीक आहे. आपल्याला तसे वाटल्यास तसे समजावे. याआधी मी या संकेतस्थळावर 'बागेत चालणाऱ्या चोरट्या प्रणयचेष्टा', 'खजुराहो' वगैरे विषय बघितले होते. तेव्हा आपले हे मत मला दिसले नाही. कदाचित आपल्याला ते 'सगळ्यांचे लक्ष जाण्यालायक विषय' वाटत असावेत. माझी अशी विनंती आहे की जमल्यास यापुढे आपण 'तिकडे' लक्ष देऊन पहा, म्हणजे आपल्याला या चर्चेत भाग घेताना काही बऱ्यापैकी मुद्दे मांडता येतील. हा हा हा हा!
३. चाणक्य यांचा मुद्दा - युवतींना काळजी नसल्यास मी का करावी? 'युवतींना काळजी नसणे' याचीच काळजी वाटायला पाहिजे असे माझे मत आहे. एक अतिशयोक्त विधान करतो, माझ्या मुद्याच्या पुष्ट्यर्थ! समजा उद्या एखादी युवती बिकिनी घालून स्विमींग टँक मधून तशीच घरी निघाली ( समजा असे ६० वर्षांनी घडले ) तर त्यावेळेसच्या समाजमनाच्या धारणेप्रमाणे कदाचित ते स्वीकारार्हही असेल. पण याचाच अर्थ असा की ही जी 'बदल स्वीकारला जाण्याची मानसिकता' आहे ती आज जे या मुद्याला विरोध करत आहेत त्यांच्या सारख्या लोकांमुळे निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. मग बी पी ओ मधील गुन्हे वगैरे मध्ये पुरुषांना पूर्ण दोषी धरण्यात काय अर्थ आहे?
४. श्री दोन पै - आपले म्हणणे पूर्णपणे मान्य! मनापासून सांगतो, बहुतेक माझी चूक झाली. ( कदाचित 'शुद्ध मराठी' म्हणतात तसे माझे तेवढे लक्ष नसावे - हा हा हा हा ) मला वाटायचे की तोकड्या टी शर्ट मुळे तो प्रॉब्लेम होतो. आपण खरा 'मुद्याला' हात घातलात. असो. आपल्यामुळे कदाचित काही जणांना खरा प्रॉब्लेम कळेल, माझी चूकही कळेल अन कदाचित या विषयावर आता वेगळी मते येतील. ( त्या क्षेत्रातील माझे ज्ञान तसे अल्प असल्यामुळे माझी ही चूक झाली असावी ).
सर्वांचेच धन्यवाद!