मराठीत असणारे "ळ" हे अक्षर हिंदीत नाही. पण, अनेक दक्षिणी भाषात आहे. हे लक्षात घेऊन राजभाषा हिंदीत (official language) , विशेषनामे लिहताना "ळ"चा वापर करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यामुळे जळगाव शब्द हिंदीत लिहताना 'जलगांव' लिहण्याची आवश्यकता नाही.

हिंदीवाले तसे लिहणार नाहीतच! आपण त्यांना 'ळ' चा वापर करणे भाग पाडायला हवे. साऱ्या रेल्वे-स्थानकांची नावे बदलून घेण्याचे एखादे आंदोलन राज ठाकऱ्यांनी हाती घ्यायला हरकत नाही! (राज असे कारण शोधत असतातच!)

मी हिंदीत लिहताना 'काळे' च लिहत असे, काले नव्हे!