स्थळ, काळानुसार ब्रह्म कधी आईत, बॉसमधे, प्रेयसी वा बायकोत दिसतो. तर कधी, बसमधली खिडकीची जागा, मोकळा सुनसान हमरस्ता, स्वच्छ घासलेली भांडी अशा प्रसंग / परिस्थितीत दिसतो. बाह्य जगात शोधता शोधता, कोऽहं? कोऽहं? असा प्रश्न देखील पडतोच.
ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम यांच्या उंबरठ्यावर अशाच प्रकारचे अनुभव 'नेती नेती' च्या बाबतीतही येतात. जर आपल्या सौभाग्याने तरुणपणी कुठलेच ब्रह्म (की माया? )आपल्या आयुष्यात आले नाही, तर त्याला आयुष्यात आणावं लागतं. थोडक्यात 'अरेंज्ड मॅरेज'. त्यामुळे ह्या ब्रह्मानुभवाला 'अरेंज्ड ब्रह्मानुभव' म्हणायला हरकत नाही. तर, लग्न ठरण्यापूर्वी होणाऱ्या बायकोबद्दलची अनेक चित्रे कल्पनेच्या कुंचल्याने रंगवून झालेली असतात. त्यामुळे मुली बघायचे कार्यक्रम जेव्हा होतात, तेव्हा सामान्य माणसाला, त्यालाही किमान अपेक्षा असल्याने, काही स्थळं पसंत पडत नाहीत. आणि घरच्यांना 'नेती नेती' (हे नाही, हे नाही) असं सांगावं लागतं. पण लग्नानंतर मात्र 'सर्वांभूती एकच ब्रह्म' अशा प्रकारच्या संतवाणीचा अनुभव येतो. ज्याला मी 'नेती नेती' म्हणत होतो त्यातल्याच एका भुताला (महिलावर्गाने क्षमा करावी, मुलींनी नाही केली तरी चालेल) ब्रह्म मानावं लागतं. आणि मग 'या' नेती नेती पेक्षा 'ती' नेती नेती अधिक चांगली होती की काय? अशी व्यर्थ शंका मनात येते. शंका व्यर्थ अशासाठी, की ब्रह्म हे केवळ बाह्यरूपाने भिन्न असते, तत्त्वरूपाने समानच. त्याचप्रमाणे बायको ही 'रूपाने' जरी भिन्न असली, तरी 'वृत्ती-रूपाने' समानच.
हे विशेष आवडलं!!
आम्ही ईंजिनीयरींग करताना सुद्धा त्यात अध्यात्मीक दृष्टिकोन ठेवायचो. म्हणजे जिकडे तिकडे फक्त तत्त्वेच पहायची, मग म्हणून कदाचीत , डॉक्टरांसारखी फक्त ' X-Ray ' बघण्याचीच सवय लागते. 'फोटोंमधली' रसिकता उमजत नाही. 'भुताची' उपमा आवडली. " सर्वांभूती एकच भूत " म्हणणे जास्त सुयुक्तिक ठरेल का याचा विचार करतो आहे.
धन्यवाद!!! पुढच्यास ठेच मागचा शहाणा !!