क्षणाचा सोबती आणि भूषणशी सहमत..
आजकाल अंगांगप्रदर्शन करणारे कपडे घालून फिरणे हीच फॅशन झाली आहे. मुली-मुले दोघेही मागे नाहीत यात. मुलांच्या जिन्स तर लो वेस्ट पेक्षा नो वेस्ट जिन्स म्हणणे जास्त योग्य होइल.
>>यावर काही प्रतिबंध असायला हवा काय? जर तसा प्रतिबंध करणे हे लोकशाहीच्या विरुद्ध असले तर नेमके काय करता येईल? >>>
एल एन टी इंफोटेक मध्ये माझा भाऊ काम करतो. त्याच्या ऑफिसातिल खुप मुली नेहमीच ३/४ जीन्स, वरती जेमतेम लांबीचे टी शर्टस, अंतर्वस्त्रे दाखवणारे शर्टस आणि स्कर्ट वगैरे घालून यायच्या. हे प्रकार एवढे वाढले की शेवटी एच आर डिपार्टेमेंट ला नोटिस काढून असले प्रकार बंद करावे लागले. ऑफिसात कोणी काय कपडे घालावेत हा सल्ला देणारी पोस्टर्स लावावी लागली. पुरुषांना पण सोमवार ते गुरुवार शर्ट-ट्रावझर्स आणि फक्त शुक्रवारी टीशर्ट-जीन्स असा सल्ला देण्यात आला. तेव्हा कुठे परिस्थिती सुधारली.
आपल्या मुलीना कपडे घेताना आपण लहानपणापासुनच नीट अंगभर कपडे घ्यावेत. १० व्या वर्षापर्यंत शॉर्टस घालून हुंदडणाऱ्या मुलीला अचानक आता उद्यापासून फ्रॉक घाल म्हणून जबरदस्ती केली तर कसे चालेल?
>>>स्वतःच्या देहाच्या प्रदर्शनाबाबतीत असलेला हा दुटप्पीपणा माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचा आहे. समजा अशी एखादी मुलगी वर्गात लेक्चरला बसली, तर लेक्चरकडे मुले लक्ष देऊ शकतील का? >>>>>
आपण कुठे कशासाठी जातोय हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवावे... लेक्चरला बसून दुसरीकडे ध्यान गेले तर प्राध्यापक बाहेर काढतीलच की. इकडे तिकडे बघायचे असेल तर कॉलेजचा बाहेर कट्टा असतोच की.... मुंबईतल्या काही कॉलेजात ड्रेस कोड आहे असेही वाचनात आले आहे.
>>>>ही कुठली मानसिकता आहे? यातून काय स्टेटमेंट त्या मुलींना करायचे असते? >>>>
माहित नाही, पण सगळ्याच मुली असे करतात असे नाही. बराचश्या मुली जिन्स टिशर्ट/शर्ट/ कुर्ती असा वेश करतात पण सगळे अंग झाकले जाईल याची काळजी घेतात. आणि ज्या प्रदर्शन करतात त्या 'आम्हाला आवडते असले कपडे घालायला, लोक पाहतात म्हणून आपली आवड मारायची? ' असला प्रतिप्रश्न करतात. असल्या आवडीमागचे कारण कळत नाही.. बाईकच्या मागे बसलेल्या मुलींकडे पाहावत नाही. त्यात त्या अजून साथीदाराच्या अंगावर रेलून पुढे झुकलेल्या असतात.. आपला पाठीचा सीन काय दिसतोय याची त्यांना जाणीवच नसते.
रस्त्यावरच्या भिकाऱ्याने पण आपल्याकडे पाहून शिट्टी वाजवावी इतकी आपली किंमत कमी करून घेउन त्यांना काय मिळते त्यांनाच ठाऊक.. सिनेमे/टिवी चा प्रभाव, अजून काय? आपण ज्या समाजात राहतो तिथल्या समाजाचे संस्कार, मानसिकता काय आहे यांच्याशीच यांचे देणे घेणे नाही. बहुतेक टीवीवर/चित्रपटात दिसतो तोच समाज असा समज असावा.