स्त्रियांच्या वेशभूषेमध्ये जेव्हा जेव्हा बदल झाले तेव्हा अशीच मते मांडली गेली असावीत. उदा. स्त्रियांनी नऊवारीच्या जागी पाचवारी नेसायला सुरूवात केल्यावर बराच गदारोळ झाला होता असे वाचल्याचे आठवते. अशीच वेळ इतर बदलांच्या बाबतीतही आली असावी. साडीऐवजी इतर कपडे घालणे विशेषतः प्यांट- शर्ट. यावरून एक निष्कर्ष काढता येतो. सर्व बंधने फक्त स्त्रियांसाठी आहेत. पुरूषांनी धोतराऐवजी प्यांट वापरायला सुरूवात केली तेव्हा विशेष चर्चा झाली नसावी.
एकच सांगावेसे वाटते. आतातरी स्त्रियांना थोडी मोकळीक द्या. शेकडो वर्षांपासून स्त्रियांची जी कुचंबणा चालत आली आहे ती आता तरी थांबवा.
हॅम्लेट