गिरीश,
एखाद्या व्यक्तीने डोके खाजवले म्हणताना 'ती व्यक्ती विचार करीत आहे', आणि गुढगा खाजवताना मात्र 'तिला डांस चावला असेल' असे म्हणणे म्हणजे आपला पूर्वग्रहदोष आहे, असे तुम्हांस वाटत नाही काय?
जर एखादी व्यक्ती विचार करताना नैसर्गिक रीत्या गुढगा खाजवीत असेल तर 'तिला डांस चावला असेल' असे म्हणणे म्हणजे आपले प्रस्थापित विचार बेगुमानपणे दुसर्यावर लादणे आहे, त्या व्यक्तीच्या विचारपद्धतीचे हेतुपुरस्सर अवमूल्यन करणे आहे, तिच्या विचारस्वातंत्र्याची पद्धतशीरपणे पायमल्ली करणे आहे, किंबहुना तिच्या एकंदर व्यक्तिस्वातंत्र्याचीच निर्दयपणे गळचेपी करणे आहे, ह्याचे भान तुम्ही ठेवल्याचे दिसत नाही!