नऊवारीतून सहावारी/पाचवारी आणि त्यातून सलवार कमिज/शर्ट-पँट कडे हा प्रवास अर्थातच स्त्रियांच्या सोयीसाठी झाला आहे.   

अंगाचे जे भाग कपड्यांनी झाकायची पुर्वापार पद्धत आहे, (पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगातही) नेमके  तेच भाग  उघडे पडतील असे कपडे घालायचे, आणि तसे घातल्यामुळे स्त्रियांची कुचंबणा थांबणार आहे हे कसे काय बुवा??    आणि हल्ली असे कपडे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही घालताहेत..  आजकालच्या मुलांच्या पँटी इतक्या खाली आलेल्या असतात की आतली अंतर्वस्त्रे तर दिसतातच शिवाय पँट आता घसरून पडतेय की काय अशी एक भीती वाटते. (तिही उगिचच, ज्याने घातलेली असते, तो तर बिंधास्त असतो)

जाता जाता....कुठेतरी असे वाचलेले की स्त्रियांच्या कपड्यांचे डिजायनर जास्त करून पुरूष आहेत आणि ते स्त्रियांचे कपडे बनवताना,  सोयीपेक्षा, पुरूषांच्या नजरेला आकर्षक दिसेल की नाही याचा विचार करून कपडे बनवतात.   त्याचा परिणाम म्हणजे आजचे हॉलिवुड आणि बॉलीवुड तारकांचे कपडे,  जे जिथे पाहिजेत तिथे कमी असतात आणि जिथे गरज नाही तिथे भरपुर असतात....त्याचाच परिणाम आपल्या समाजात दिसतो...  विशेषतः मेट्रोज मध्ये.  अर्थात चित्रतारकांनी असे कपडे घालण्यात वावगे काहीच नाही,  अंगप्रदर्शन हाच त्यांचा धंदा आहे.  पण शाळा कॉलेजातील मुली, इतर सर्वसामान्य मुली  यांनी त्यांचे अनुकरण करण्याचे कारण काय? अंगप्रदर्शन हा त्यांचा धंदा नाहि.