"हिताहीत प्रसंगात चाकोरीबद्धतेच्या बाहेर जाऊन मदत करणारी, तरीही नीती व कायदे सांभाळणारी" अशी सज्जनांची मैत्री असते. हा मुद्दा अधिक स्पष्ट व्हायला हवा.
रामाने वाली वध करताना चाकोरी पाळली नाही, असे म्हणायाचे आहे काय? तिथे तर रामाने नीती नियम धाब्यावर बसवत, एका अनोळखी त्रयस्थास अकारण (केवळ नवा मित्र जोडावा- त्याची (सुग्रीवाची) इच्छा पुर्ण करावी, स्वतःस मदत मिळवावी या हेतूने) त्याच्याशी (वालीशी) काहीच वैर नसताना, समोरासमोर न येता ठार मारावे; वर मी "शाखा-मृग मारला, मृगया केली" असे सांगावे; यात नैतिकता कोठे आली? येथे तर वाली-वध झाला नाही तर नैतिकतेचाच वध झाला असे म्हणावे लागते!
रामाकडे देव म्हणून पाहणारी मंडळी रामाला सज्जन म्हणून संबोधणार! एकदा त्याला देवत्व बहाल केल्यावर चिकित्सक नजर हरवून बसते.