शिक्षण हे आजीवन चालते हे खरे!
प्रशिक्षण ही ज्या त्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची/ व्यावसायिकांची कार्य-कुशलता वाढावी; ग्राहकांचे अधिक चांगल्या प्रकारे समाधान व्हावे; त्याच वेळी संबंधित संस्थांच्या हित-संबंधास बाध येऊ नये, हातून काही अवैध घडू नये या साठी असते. नव-नवे ज्ञान/ तंत्रज्ञान सतत येत असते. प्रत्येकास अद्ययावत राहणे भाग असते. प्रशिक्षण या गरजा पुऱ्या करते. प्रशिक्षणाचे उद्देश मर्यादित असतात.