आपण मराठीसाठी आग्रही राहिल्याखेरिज मराठीत व्यवहार होणार नाहीत. 'चालतयं!' हे चालू देणारे आपणच!

जीवनाच्या अनेक क्षेत्रात हिंदी-इंग्रजीचे अनावश्यक आक्रमण थोपवण्यासाठी कृतिवीरांची गरज आहे; बोलघेवडे काय कामाचे? केवळ राष्ट्रीयकृत बँकातच नव्हे तर सर्वच बेंकांमधून मराठीचा आग्रह खातेदारांनी धरायला हवा.