संतोषराव,
मला अभिप्रेत आहेत ती सामान्य माणसे! स्तुती (म्हणजेच कौतुक ) करणारी ही आणि ज्यांचे कौतुक करायची ती ही! त्यातून स्वतः आनंद घेणारी व इतरांना देणारी! आनंदाच्या लाटांची गरज असणारी! सकारात्मक विचारांना प्रतिसाद देणारी!
या सर्वांच्या पलिकडे गेलेली - स्थितप्रज्ञ अवस्थेकडे सरकलेली, किंवा स्तुती निंदा सारखीच म्हणणरी - आपला शब्द ध्यासस्थ-त्यांच्यासाठी हा मंत्र नाहीच! पण त्याचे जरी कौतुक केले तर कौतुक करणाऱ्याला आनंद मिळणारच आहेच!
सुखाचा शोध घेत राहणाऱ्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना सुखाचे नवे स्त्रोत हवे असतात. मी काही नवा स्त्रोत सांगत नाही. पण कदाचित कोणाचे त्याकडे दुर्लक्ष झाले असेलच तर त्याचे पुन: एकदा लक्ष वेधत आहे इतकेच!
कुशाग्र नि एक नवाच मुद्दा उपस्थित केला आहे.
सुभाषित अननुकारणिय नाही असे त्यांचे म्हणणे!
कोणतीही सुभाषिते जशीच्या तशी घ्यायची नसतात; विचारपुर्वक आपल्याला योग्य-अयोग्य वाटतील त्या प्रमाणे स्वतःची बुद्धी वापरून अनुकरणिय अथवा अननुकरणिय किंवा अंशतः अनुकरणिय ते ठरवायचे असते. हे सुभाषित अंशतः अनुकरणिय मानण्यास माझी हरकत नाही!