भूषण उदाहरण दिलेच आहेस म्हणून सांगतो. तु एकदम बिकिनीवर उतरलास. मुळातच शॉर्ट टी शर्टच्या चर्चेत सगळेच जण टि शर्ट वरुन पॅंट खाली असण्यावर घसरले आहेत. असो. तुयला असाच एक अतिशयोक्ती प्रश्न विचारतो. शॉर्ट ऐवजी थोडा लांब म्हणजे कमरेच्या थोडासाच खाली असा टि शर्ट झातला आणि खाली काहीच नाही अथवा शॉर्ट चालेल का?
आज या हे तुझ्या डोळ्यात भरते आहे कारण ते अजून सुद्धा सामान्य नाहीये. याचेच एक उदाहरण देतो. एका दशका पुर्वी आपल्याकडे मोबाईल फोन असणे आणि आत्ता असणे यामधला फरक जाणवतो का? आता तो एकदम अतिसामान्य प्रकार आहे. भविष्यात जो काही येणारा फॅशनचा प्रकार आहे तो सर्वमान्य झाला तर तुमच्या नजरा तिकडे जाणे अथवा न जाणे सामान्य होऊन जाईल. मुळात तुमचा स्त्रीकडे पाहण्याचा उद्देशच जर भोगवादी असेल तर मग तुम्ही बुरख्यातून सुद्धा हवे ते शोधाचायचा प्रयत्न करता. उगाच मुलिंना दोष का द्यावा?
दुसरे उदाहरण समलिंगी संबंधांचे, आज त्याचे भारतात उदात्तीकरण होत आहे. असो. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण एकुण प्रतिसाद पाहून लोकांना टोकाच्याच भुमिका घेणे आवडते असे दिसते.