"वाट जग ह्याचीच बघतय, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे
खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
का तरी माझा स्वत:शी चालला संग्राम आहे?
लक्तरे लेऊन अंगी धाडले होते लढाया
अंत्ययात्रेला परंतू केव्हढा इतमाम आहे" ... वा, फारच सुंदर- प्रत्येक द्विपदीतली कल्पना आवडली !