खालिल वाक्ये, घटनांचा अनुक्रम आणि अनुमानीक तर्क, निःपक्ष की पक्षपाती ते नंतर कृपया, मला कळवावे.
रामाचा राज्याभिषेक निश्चित झाला होता.[म्हणजे रामाकडे, राजाची शारिरीक, मानसिक, बौद्धिक व ईतर सक्षमता होती.] रामाला १४ वर्षे वनवासाची आज्ञा झाली.[ म्हणजे रामाकडे, अनभिषीक्त सक्षमता होतीच. ]
राम वनवासी झाला. [ म्हणजे राम, अनभिषिक्त, वनवासी, सक्षम राजा होता. हवे तर, सक्षम, अनभिषिक्त, वनवासी राजा होता. असे म्हणणे योग्य राहील. OK? ]
भरतभेट झाली, भेटित असे ठरले, सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवायच्या आणि भरताने " रामाचा प्रतिनिधी" [वैयक्तिक प्रतिनिधी ] हे सरकारी पद, १४ वर्षे किंवा रामाचे पुनरागमन, होईपर्यंत [whichever is later and not earlier] भुषवायचे. [ रामाचा भाऊ, हे पद वा ही अर्हता वा पात्रता "नाहीच". ] [ म्हणजे, राम, सक्षम, अनभिषिक्त, वनवासी, पण लोकमान्य व प्रतिस्पर्धी / प्रतिवादी [भरत] अनुमोदित / "वंदित" राजा होता. ]
रामाच्या उपरोक्त विशेषणांवरून त्याच्यावरील, जबाबदारींचे व त्या निर्वहनासाठीच्या, त्याच्याकडे असणाऱ्या अधिकारांचे आपण काय अनुमान लावाल?
मी असे लावतो. दैनंदिन राज्यकारभारासाठी आवश्यक व पुरेसे [किरकोळ निर्णयक्षमता जिथे लागते, असे / जिल्हा कोर्ट स्तराचे ] [necessary and sufficient] असे तात्कालीक अधिकार फक्त रामाने, भरताकडे सुपुर्द केले. बाकी सर्व अधिकार [हायकोर्ट वा सुप्रीम कोर्ट स्तराचे निर्णयाधीकार तसेच दूरगामी परिणाम करणारे सामरिक निर्णयाधिकार देखिल रामाकडेच "अबाधीत" होते.] वनवासी असल्यामुळे, सरकारी यंत्रणा, स्वतःच्या उपयोगासाठी वापरू नये अशी रामाने स्वेच्छा अचारसंहीता [ moral code of conduct] स्विकारली होती.
या स्पष्टिकरणात खरे तर, वालीवध हा न्याय, नितींना अनुसरून आहे, हे सिद्ध करण्याची क्षमता आहेच.
तरिही, आपले समाधान न झाल्यास, मी ते करण्यास समर्थ आहे.
सुग्रीव व वाली मधील संघर्षात, रामाने [judicial activism] न्यायाधीषीय स्वदखल घेतली आहे.[इथे चाकोरीबद्धता सोडून सुग्रीवाला मदत केली--स्वदखल घेऊन न्याय मिळवून देणे, म्हणजे, चाकोरीबद्धता सोडणे होय. ] सुग्रीवाला --वादी व वालीला --- प्रतीवादी बनवले आहे. ही हिंट समजावी.
वालीवधानंतर, सुक्ष्म अज्ञानी, [ म्हणजे मेजॉरिटी ] आपल्याला नावे ठेवणार, आपल्या लौकिकाला गालबोट लागणार हे रामाला अपेक्षीत असावे की नसावे, हे कृपया मला "एकाच" शब्दात लिहून सांगावे.
"तंटामुक्तीचे सामाजीक प्रतीक म्हणून समितींनी वालीवधाचे चित्र खुंटीवर लावावे काय?" असे प्रश्न फक्त अर्धवटांना पडू शकतील.हे आपणास उद्देशून "मुळीच नाही."
मुळ प्रश्नाचे विषयांतर होऊ नये, यासाठी सर्वांना नम्र आवाहन व प्रार्थना !