माझ्या प्रश्‍नाने व आपल्या उत्तराने जनतेचे सुक्ष्म प्रबोधन झाले, असे नाही का वाटत आपल्याला? मुख्य लेखातली अनेक गृहितके अशाने स्पष्ट होत असतात व कार्य--कारणभावाची / कर्तव्याकर्तव्याची कृतीकक्षा [scope]  ठरत असते.

असो...

'स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कधीही व्यर्थ नराची"

यात

सुभाषिताच्या उत्तरार्धात " करू नये व्यर्थ कुणा नराची" असे म्हटले आहे (आपण सुभाषित व्यवस्थित उल्लेखिलेले नाही) म्हणजे उगीचच किंवा खोटी स्तुती करू नये. स्तुती करणेच व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ नाही.   त्या दृष्टीने सुभाषित अननुकरणीय नाही.
इती. श्री. कुशाग्र.

 ---इथे, व्यर्थ हे विशेषण, स्तुतीचे असा अर्थ अभीप्रेत आहे.

तसेच,

कोणतीही सुभाषिते जशीच्या तशी घ्यायची नसतात; विचारपुर्वक आपल्याला योग्य-अयोग्य वाटतील त्या प्रमाणे स्वतःची बुद्धी वापरून अनुकरणिय अथवा अननुकरणिय किंवा अंशतः अनुकरणिय ते ठरवायचे असते. हे सुभाषित अंशतः अनुकरणिय मानण्यास माझी हरकत नाही! इती. श्री. जोशी.

------इथे, व्यर्थ हे विशेषण  नराची असा अभीप्रेत आहे. 

माझा तर्कः  व्यर्थ हे विशेषण स्तुतीचेच. त्या अनुषंगाने, नराची " सकारण" स्तुती करावी, व्यर्थ = अकारण अशी स्तुती करू नये. असा साधा, सरळ, माझी अल्पमती वापरून आशय निघतो. हे माझ्या सर्वात पहिल्या, वहिल्या प्रतिसादाशी समेळ आहे. हेच मानसशास्त्राच्या स्तुतीबाबतीतील तत्त्वांशी सुद्धा समेळ आहेच.

अशाने, सुभाषीत माझ्यासाठी संपुर्ण अनुकरणीय मानतो. ज्याने त्याने स्थळ, काळ, वेळेनुसार निर्णय घ्यावा.

(व्यक्तिगत रोख व/वा संदर्भ वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)