जंगली प्राणी जगतातील की नागरीकरण झालेले प्राणी जगतातील? की अर्धवट जंगली व अर्धवट नागरीकरण झालेल्या वर्गातील? बाकी, द्वितीया प्रत्ययाने स, ला, ते, -----स, ला, ना, ते अशा स्वरुपाच्या लेखनाने शब्दार्थ वा मथितार्थ वस्तुनिष्ठ निघू शकत नाहिये. कर्ता, कर्म ठरुच शकत नाही.
सर्व प्राण्यामध्ये नराला मादीला आकर्षित करावे लागते.
मात्र स्त्री आणि पुरुषामध्ये स्त्रीला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात असे कोठेसे वाचल्याचे स्मरते. त्यामूळे काही मुलींनी आपले सौष्ट्व दाखविणे अथवा अंगप्रदर्शन करणे हा नैसर्गिकच भाग समजायला हवा.
कोण, कोणाला आकर्षित करतो, करावे लागते हे स्पष्ट होत नाहीच.
नुसत्या, " नराला मादीला " अशा अनुक्रमे कर्ता, कर्म ठरू शकते का?
तसेच, " स्त्रीला पुरुषांना " यामुळे सुद्धा कर्ता, कर्म ठरू शकते का?
एकुण गोळाबेरीज = अर्थशुन्यता.
" स्त्रीयांची नैसर्गीक गरज " म्हटल्याने सगळे माफ? शास्त्रीय आधार / संदर्भ काहीतरी द्यावा, नाहीतर फक्त मी म्हणतो, म्हणजे खरे असा लेखकाचा आवेश आहे असा अकारण ग्रह होऊ शकतो.
बाकी, आपण स्वतःला, जंगली प्राणी जगतातील की नागरीकरण झालेल्या प्राणी जगतातील समजायला पाहिजे?
[ delaying gratification ] असे नियम नागरीकरणात समाविष्ट असतात.
ओंगाळवाणे, अश्लिल वा बिभत्स वर्तन, यांची स्थळ, काळ, वेळेनुसार, व उदात्तीकरणाच्या प्रमाणानुसार व्याख्या, संकल्पना वा कसोट्या बदलू लागल्यात का?