माझाही तुमच्यासारखाच अनुभव आहे. एमिली ब्राँटेच्या कित्येक कादंबऱ्या आता उपलब्ध आहेत पण वाचायची इच्छा होत नाही. मात्र त्यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद मात्र आवडिने वाचतो.
मुळात मला हिंदी आणि इंग्लिश वाचायला फारसं आवडत नाही. मात्र विज्ञानाची पुस्तके कोणत्याही भाषेत असली तरी वाचतो. "द हिस्ट्री ऑफ क्वांटम मेकॅनिक्स" हे पुस्तक नागपुरात ३० रु. ला विकत घेतलं. (जुन्या बाजारात) मात्र ते वाचलं ४ वर्षांनंतर!
पदवीला (B.Sc. ) असताना मात्र पुस्तकांचा फडशा पाडला, अगदी काही इंग्लिशसुद्धा. पण पहिल्या वर्ष्याला असलेल्या "इंग्रजी भाग १" चं पुस्तक विकत घेण्याचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही मी. त्यातली एक कविता मात्र फारच सुंदर होती, "द स्टोन". एक जवानाची प्रेयसी त्याच्या मृत्युनंतर "स्टोन" होते.....
विजय