तुमचा लेख वाचून स्टाईनबेकच्या चार्लीची आठवण झाली. 

जॉन स्टाईनबेककडे चार्ली नावाचा फ्रेंच पूडल या जातीचा कुत्रा होता.  त्याचं पूर्ण नाव शार्ल्स ले शीन ऊर्फ चार्ली ! (कुत्र्यांनाही पूर्ण नाव असतं!!?)  स्टाईनबेकनं त्याला बरोबर घेऊन जवळ जवळ आख्खी अमेरिका पालथी घातली.  आणि त्यानंतर 'ट्रॅव्हल्स विथ चार्ली : इन सर्च ऑफ अमेरिका' अशा नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिकही मिळालं. 

अवांतरः तुम्हालाही असा काही प्रयत्न करून बघायला हरकत नाही !! इथल्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असातील!!