अतिशय मुद्देसुद लेख.
या लेखाची लिंक महाराष्ट्रातील वर्तमानपत्राना पाठवणे योग्य ठरेल.
आपल्या लेखातील शेवटी ठळकपणे लिहिलेल्या मुद्द्यान्मध्ये आणखी एक भर घालू इच्छितो.
४ या मंडळाचा मूळ हेतू महाराष्ट्र सरकार कडून पंचवीस लाख रुपये उकळून मजा मारणे हा आहे.
महाराष्ट्रात विद्रोही साहित्य सम्मेलन जवळ जवळ दर वर्षी सरकार कडून एकही पैसा न घेता भरविले जाते.
मग सिलिकॉन व्हली मध्ये खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या मुठभर मंडळींचे साहित्यिक चोचले पुरविण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकाना भुर्दंड का ? इथे स्थाईक झालेल्या ( माझ्यासह) बहुतेक सर्वांची मोठी मोठी घरे आहेत आणि दोन दोन गाड्या. असे असताना आपणच गरीब भारतियांच्या खिश्यावर डल्ला मारणे निर्लज्जपाणाचे आहे.
हे सम्मेलन संपल्यानंतर मराठी मंडळ सम्मेलनाचा जमाखर्च प्रसिद्ध करेल ही माफक अपेक्षा. कारण गेल्या कित्येक साहित्य सम्मेलनाचे हिशेबच अजून प्रसिद्ध झाले नाहीत. ( विद्रोही सम्मेलनाचे हिशेब सम्मेलन संपताच जाहीर होतात. )