छानच आहे कविता.

वाचक म्हणून फक्त एक सांगावेसे वाटते. शक्य झाल्यास, वाटल्यास दोन ओळींतले अंतर कमी करत जा बरे.

बोललेले शब्द काही, आणि मौनातील गाणी,
गंध ओल्या मोगऱ्याचा, पावसाचे तेच पाणी,
सारखे आहेत सारे ते जुने संदर्भ भोळे,
फक्त वाटा त्या निराळ्या, आणि मी मिटलेत डोळे ॥

कोकिळेचा सूर ताजा, आमराईतील मोहोर
बंद झाली परसदारे, आठवांचा फक्त वावर
ओसरीवर बांधलेला तो वसंतातील झोका
आज माझे एकटे घर आणि एकाकी झरोका॥

आज का आली अचानक पाउले गंधाळलेली ?
आठवे ओलीच सारी, जी कधीची टाळलेली
आज आहे एकटा मी, पावसाचे तेच पाणी-
-गातसे, ओठातल्या ओठात मुरलेली विराणी ॥


अशी मांडणी केली तर वाचताना त्रास होत नाही.