मराठी विशेषनामे इंग्रजीत लिहणे किती कठिण आहे; ते  अन्य भाषिकांना रोमन लिपीतून कळवणे सर्वस्वी अशक्य आहे असे चर्चेवरून दिसते.

प्रत्येक भाषा हिच विशेषनामे  वेगवेगळ्या प्रकारे लिहताना दिसतात हे खरे आहे. बंगाली भाषिकांनी 'शारदा' हा शब्द Sarada लिहलेला पाहिला आहे. तामिळी कदाचित 'शंतनू' Santhanu लिहतील. या साऱ्यांचा मेळ अवघड आहे.

उपाय एकच! रोमन लिपी बरोबर शक्य असेल तेथे तेच विशेषनाम देवनागरीतून ही लिहावे. ज्यांना देवनागरी येते अशी मंडळी तरी चूका करणार नाहीत. भारतात देवनागरी जाणणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. निदान तेवढ्यांपुरता तरी प्रश्न सुटेल!