षडरिपूंना समाविष्ट करुन, प्रमेयात्मक सिद्धांत, व्याख्या, संकल्पना वा कसोट्या मांडाव्या आणि मग काळाच्या ओघात, [ हजारो वर्षांच्या अंतराने सुद्धा ] किती गोष्टी [उदा. गुन्हे ] व कोणकोणत्या गोष्टी बदलतात ते प्रयोगाअंती तपासावे.
तत्त्व हे स्थळ, काळ वा वेळ यावर अवलंबून नसतात.
उदा. या मर्त्य पृथ्वीवर, जर, जमीन, व जोरू हे , अनादी कालापासून, अंतापर्यंत गुन्ह्यांचे ' उद्दीष्ट" राहीले आहे, राहत आहे व राहणार आहे.
या तीन घटकांमधे, जोरू हा एकमेव सजीव 'घटक'. त्या घटकाने स्वतःहून " स्वेच्छा बळी " [ WILFUL VICTIM ] होणे, "फक्त टाळणे" , एवढेच त्यांच्या / प्रत्येकाच्या हातात असते. आणि हेच या चर्चेच्या मुळ-लेखकाला मुख्यत्वे म्हणायचे आहेच.
[ प्रतीबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठच. हे देखील तत्त्वच, १०,२०,१००,२००,१०००,२०००,..... वर्षांपर्यंत सत्यच राहणार.]
विचारा श्री. भुषणजींना.
उदा. रासायनीक प्रक्रियेचे घेउया.
अ + ब = क ------- OK?
उपरोक्त प्रक्रिया या एका गृहीतकावर अवलंबून असतात. ते म्हणजे N.T.P. [ अंडर, नॉर्मल टेंपरेचर अँड प्रेशर ]
N.T.P. हे MILIEU भोवतालचे वातावरण, प्रक्रिया, सिद्ध करत असते. बाकी ही प्रक्रिया भारतात, अमेरीकेत, चीन मधे, रशियात सगळीकडे एकच परिणाम देते. [ "जर" NTP काँन्स्टंट ] . यात अ, ब, क च्या मुलद्रव्यात्मक व्याख्या, संकल्पना वा कसोट्या कधीच कोठेच बदलणार नाहीत.
सजीवांच्या एकत्रीकरणाच्या शास्त्रात [समाजशास्त्रात ] सुद्धा अशीच मुलद्रव्ये, प्रक्रिया, व्याख्या, संकल्पना, कसोट्या असतीलच.
मग 'बदलते' काय? म्हणजे काय काय सापेक्ष? ...... तर उपकरण व परीणामांचे स्वरूप वा अपवाद.
माझे वैयक्तीक मत, समाजशास्त्रींना विचारून किती खरे / खोटे ठरवावे.
सगळ्याचे साऽऽऽर ' तत्त्व'.