'वेगळे वातावरण' हा मुद्दा बहुतेकांनी चर्चिला आहेच त्यामुळे त्याची पुनरुक्ती करीत नाही. पण या कथेचे बलस्थान तेवढेच नाही.

मोजके पण परिणामकारक शब्द, 'वेगळ्या' वातावरणाची नाळ 'आपल्या' वातावरणाशी जोडणारे दुवे ("आपली ट्रेन किंवा फ्लाईट लेट झाली तर एकदोन तास वाया गेले म्हणून आपण चरफडतो, इथे आयुष्ये वाया चालली होती", "पुढे आयुष्यात आपण एवढे कसे निर्ढावत जातो! समाजाच्या ज्या स्तरात आपण राहतो त्याच्या बाहेर डोकावून पाहण्याचा प्रयत्नही फारसा होत नाही"), सहज संवादी उपमा (रविवार सकाळचा संथपणा), अतिआदर्शवादाच्या भोवऱ्यात न सापडता आखलेला शेवट आणि पुढे काय होईल (वा होणार नाही) याबद्दलची उत्सुकता....

सहज जाणवलेले हे काही मुद्दे.

एकंदरीत, कथा 'भिडली' हे म्हणतानाच दोन हरकती तेवढ्या नोंदवून ठेवतो.

पहिली म्हणजे शेवटी शेवटी "एक अवघड गोष्ट तिला त्यांच्या गळी उतरवायची होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर लंच स्वतःच्या गळी उतरवण्याला पर्याय नव्हता" हा विनोदाचा उबगवाणा प्रयत्न टाळला असता (अशा पांचट शब्दकरामती करायला अनेक जण आहेत, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही) तर कथेला गालबोट लागले नसते. दुसरी, आणि अधिक तीव्र हरकत म्हणजे तुमच्या कुवतीच्या व्यक्तीकडून अधिक नियमित लिखाण अपेक्षित आहे. तुमच्या "एका दिवसाची गोष्ट" यानंतर ही कथा यायला सव्वा वर्ष उलटून गेले!

आता अजून सव्वा वर्ष वाट पहायला लावू नका!!