भारतात देवनागरी जाणणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे.
ही गैरसमजूत आहे. आमच्या केंद्रसरकारच्या कार्यालयात असे अनेकजण होते की त्यांना देवनागरी अजिबात वाचता येत नव्हती. हिंदी परीक्षेला बसणारे त्यांतले बहुसंख्य नापास झाले, पण त्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा दाखला मिळाला, आणि त्याबद्दल एक पगारवाढ. त्यांना उर्वरित नोकरीत कधीही देवनागरीतला मजकूर वाचावा लागला नाही.
अवांतर--मी प्रवास करीत असताना मला मध्येच एक गांव लागले, नाव होते ओओटी. या गावाचे इंग्रजी स्पेलिंग काय असावे? तर्क करता येईल? ब्रिटिशांनी केलेले स्पेलिंग मला आवडले.
तसेच सइलापुरे या आडनावाचे स्पेलिंग काय करायला पाहिजे? फार काय, अअअअ हा शब्द इंग्रजीत कसा लिहावा?