समजा अशी एखादी मुलगी वर्गात लेक्चरला बसली, तर लेक्चरकडे मुले लक्ष देऊ शकतील का?

वा, वा म्हणजे वर्गात लाँग टी शर्ट किंवा बुरखे घालून मुली बसल्या म्हणजे सगळे मुलगे विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण!! लेक्चरर्सना हा सोपा उपाय माहीत नसावा.

चर्चेत स्त्रियांवरील अत्याचारांबद्दल त्यांच्या कामोत्तेजक कपड्यांना जबाबदार धरताना याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो की सहा महिन्याच्या मुलीपासून ऐंशी वर्षांच्या म्हातारीवरसुद्धा बलात्कार झाल्याची उदाहरणे आहेत. त्यांनी शॉर्ट टी शर्ट घातले नव्हते.