तुम्ही दिलेला हिंदी परीक्षांचा संदर्भ खरा आहे. माझी आई नवव्या इयत्तेत हिंदी पंडीत झाली आहे. आता तिचे वय ५७ आहे. बाबा सगळ्यांना हे सांगायचे तिच्या पंडीत परीक्षेबद्दल. मला वाटायचे त्यात काय विशेष? पण हे आई-बाबांना विचारायचे धाडस नव्हते. पण आत्ता तुमच्या लेखात हा उल्लेख वाचून लक्षात आले की बाबांना तिचे का कौतुक वाटायचे ते. सहज आठवण आली म्हणून उल्लेख केला. तशी मी ही हिंदीच्या परीक्षा दिल्या आहेत पण 'बालबोध' च्या पढे गेले नाही. कारण आमच्या काळात इंग्रजीच्या परीक्षा जास्त महत्त्वाच्या वाटायला लागल्या.

बाकी तुम्ही वाचनाबद्दल म्हणले आहे ते अगदी खरे. मला वाचनाचा इतका उत्साह नाहीच. पण कधी मूड येतो पण तो मावळण्याचे काहीतरी कारण लगेच तत्परतेने पुढे येते. मग आनंदीआनंद.पण याचे वाईट वाटते. खूप वाचायची इच्छा आहे. पण!!!!!!!!!!!! हा पण फार वाईट.

पण आता "पण" करते की खूप वाचायचे आळस झटकून. मला शुभेच्छा द्या.