पेहरावाच्या बाबतीतील ( विशेषतः स्त्रीयांच्या ) बदलणाऱ्या संकल्पनांना मूढपणे विरोध करणे ही माझी भूमिका नाही. जर सोयीचे असेल तर ( जसे महिला पोलीसांच्या बाबतीत झाले ) साडीऐवजी शर्ट पँट परिधान करणे हे योग्यच आहे.
मला असे म्हणायचे होते की स्वत:च शॉर्ट टी शर्ट किंवा शॉर्ट पँट घालून दुचाकीवर मागे बसणे अन मग उगाचच दर दोन मिनिटांनी टी शर्ट खाली ओढत बसणे हे अयोग्य आहे. ( कुणीतरी निरीक्षणशक्तीला दाद देणार हे माहीत आहे. )
मुळातच असे उत्तेजक पेहराव करून रस्त्यावर यायचे कशाला? जेव्हा वर ओढलेला टी शर्ट दहा पंधरा सेकंदांनी ( खड्ड्यामुळे, ब्रेक लावल्यामुळे, पुढील दुचाकीस्वार हा 'जवळचा मित्र' असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे, परत टी शर्ट खाली ओढता यावा या दुर्मीळ सात्त्विक इच्छेमुळे ) वर येतो तेव्हा इतरांना काय दिसत असावे याची त्या संस्कृतीरक्षक सुकन्येला निश्चीतच कल्पना असणार! म्हणजेच ते हेतूपुरस्पर झालेले शरीर प्रदर्शन आहे यात वाद नसावा.
आता जर हेतूच तसा असेल तर तो हेतू कुठल्या मानसिकतेतून येतो अन तो प्रतिबंधित करण्यायोग्य आहे की नाही हे माझे दोन मुद्दे होते.
प्रतिसाद ( विरोधी व सहमतीचे ) देणाऱ्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद! चर्चा चालू राहावी कारण त्यातून अनेक मुद्दे निघत आहेत असे दिसते.