मनापासून 'समाजसेवा' करू पाहणाऱ्या पंकजाची तगमग चांगली टिपली आहे तुम्ही. गुतानुगतिकतेच्या फेऱ्यात सापडलेल्यांच्या मनाची जी फरफट होते, तीच पंकजाचीही झाली आहे. कुणासाठी तरी काही तरी करावेसे वाटणे; पण करता न येणे, ही अगतिकता सदैव जाळत राहते जिवाला... पण याचेच तर नाव आयुष्य!
कथा / अनुभवचित्र /ललितबंध... जे काही असेल ते, आवडले. भिडले. इथे भिडले हा शब्द वापरायचा म्हणून वापरलेला नाही. खरोखरच भिडला मजकूर. शुभेच्छा. पुढील लेखनही येऊ द्या.
.......
मी पूर्वी वाचलेली तीन पुस्तके, तुमचा हा मजकूर वाचल्यानंतर, माझ्या डोळ्यांपुढे आली.
१) कृष्णाबाई मोटे, (दृष्टीआडच्या सृष्टीत)
२) शकुंतला जाधव ( 'सुकलेली फुले' किंवा 'गळालेल्या पाकळ्या' किंवा असेच काहीसे या पुस्तकाचे नाव आहे.)
३) या पुस्तकाचे आणि लेखिकेचेही नाव आठवत नाही़; पण तपशील आठवतो. येरवडा कारागृहातीलच महिला कैद्यांची / मनोरुग्णांची त्यांच्या अनुभवांवर आधारित, कैफियत त्यात मांडण्यात आलेली आहे... पुस्तकाचे स्वरूप अहवालवजा आहे. लेखिका अप्रसिद्धच आहेत. समुपदेशक वगैरे असाव्यात.
ही तिन्ही पुस्तके त्या त्या वेळी मला अस्वस्थ करून गेली. ज्यांना मिळतील, त्यांनी ती जरूर वाचावीत. पैकी पहिल्या क्रमांकाचे पुस्तक सध्या अतिदुर्मिळ प्रकारात मोडते.