मूळ विषयाबद्दल बोलायचे तर,
स्लमडॉग करोडपती हा सिनेमा एक चांगला सिनेमा आहे. पण तो जितका डोक्यावर घेतला जातोय तेवढा नक्कीच नाही. सिनेमात अनेक चुका काढता येतील. पण त्याच्यावर भारताची गरीबी विकण्याचा जो आरोप होतो आहे तो पटत नाही. काही मोजक्या लोकांचे राहणीमान सुधारले म्हणजे भारतात सर्वत्र प्रगती झाली आणि गरीबी हटली असे नव्हे. जगाला गरीबी दिसली तर तुम्हाला लाज का वाटते ? ती नेत्यांना वा राजकारण्यांना वाटली पाहिजे. कारण सामान्य माणूस याबाबतीत फार काही करू शकत नाही. तरीही कितीतरी सेवाभावी संस्था आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत आहेत. पण सरकारच गरीबांसाठी खरे काम करत नाही. फक्त मलमपट्टीचा देखावा केला जातो.
सिनेमांत वास्तवच दाखवले आहे. एका गरीब मुलाला एवढी माहिती असू शकते यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पोलिसी हडेलहप्पीने त्याच्याकडून सत्य(? ) वदवून घेण्याचा प्रयत्न अगदी खराच आहे. फक्त खरे कळल्यावर सुद्धा त्याच्या कमाईतून आपला वाटा पोलिसांनी मागताना दाखवला नाही हेच काय ते अविश्वसनीय!!!