स्त्री देह आकर्षक असतोच. विशेषत; त्यांचे वक्ष:स्थळ! पुरुषांना ते भुलवते, हे नैसर्गिक सत्य! स्त्रियांना या नेमक्या स्थितीची जाणीव ही असते. त्यांचा ही नैसर्गिक कल पुरुषांना आकर्षित करून घेण्याचा असणे स्वाभाविक! निसर्ग ही जरी वस्तुस्थिती असली तरी माणसाने स्वतःच्या विकासात विवेकाची कास धरली आहे. जे भुलवते, त्याने भुलावे का? आपण मेनकेवर भुललेल्या विश्वामित्राला शाबासकी देतो का? नाही! मेनकेला सुद्धा नावाजत नाही!

समाजात विश्वामित्र ही असणार आणि मेनकाही असणार! पण त्यांना उत्तेजन न देणारे आपण जास्त महत्त्वाचे!

आणि म्हणूनच समाज-पुरुषाने(येथे पुरुष शब्दात स्त्रियाही सामील!) काही नीती नियम बनवले. ते सारे स्थल-काल-सापेक्ष असतात हे ही खरे. पण ज्या काळात, ज्या देशात ते नियम प्रचलित आहेत त्यांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे.

पण बंडखोर असणार हे सार्वकालिक सत्य!

कै.अगरकरांनी सुमारे दिडशे वर्षापुर्वी स्त्रियांच्या पोषाखासंबंधात व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, स्त्रियांच्या सोईचे, शालिनतेला बाधा न आणणारे कोणते ही पोषाख चालतील.

शालिनतेची त्या काळातली व्याख्या आज बरीच पालटलेली दिसते. शेवटी 'कालाय तस्मैनमः' हे खरेच!