स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षण म्हणजेच काम-प्रेरणा, वंश सातत्यासाठी आवश्यकच आहे. त्यासाठी आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. निसर्ग म्हणजेच प्रकृती. प्रकृती आपले काम चोख बजावत आहे, या बाबत वादच नाही.

प्रकृतीचा अभ्यास करून आम्ही घडवली आहे संस्कृती. या संस्कृतीचीच निर्मिती आहे लज्जा-भाव. या संस्कृतीला बाधक काही जेव्हा घडते ती विकृती होय. या विकृतीला रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत निश्चित आहे. त्याचा योग्य तो वापर आपण (संस्कृतीचे पाईक) विवेकाने करायला हवा.