शॉर्ट टि शर्ट वरून ही चर्चा जरा भरकटलीअ आहे. असो.
स्त्री देह, काम भावना वगैरे शब्द वापरून भुषणची कळकळ संपणार थोडीच आहे? या वर सर्वमान्य तोडगा हवा. जो सुवर्ण मध्य असेल. जेणे करुन व्यक्ती स्वात्यंत्र ही जपले जाईल आणि भुषणचे सुद्धा समाधान होईल.
- मुलींनी शॉर्ट टि शर्ट जरुर घालावेत. तो त्यांचा हक्कच आहे.
- मुद्दा आहे तो त्यामुळे जे काही दिसते, जसे पाठीचा भाग, कंबर, कंबरेखाली असेलेले आतले कपडे अथवा घातले नसल्यास दिसणारे शरीर. जे दिसते कोणाला? तर मुली मागे बसल्याने त्यांच्या मागे असलेल्या सर्वांना.
- गाडीवरून प्रवास करताना हे दिसू नये असे वाटत असल्यास (त्या मुलीला वाटणे, आणि भुषण सारखे अथवा या प्रकाराची काळजी असलेले सगळे) आणि त्या मुलीला असे कपडे घालायचेच असल्यास, सर्वात सोपा उपाय म्हणजे मुलीने गाडी अर्थात येथे दुचाकी चालवावी आणि पुरुष सहप्रवास्याने मागे बसावे. म्हणजे दिसणार कोणालाच नाही. जे काही ज्याचासाठी आहे तो त्याचा उपभोग घेऊ शकेल आणि इतर कोणाच्या भावनांना हात लागणार नाही. जर मुलगी एकटी असेल तर तिने वरून आणखी एक कपडा घालावा. जो ते झाकेल. इच्छित स्थळी जाताच पेहेरावात योग्य बदल करावा. जर इतरांना त्रास होत असेल तर त्यामुलींना गांधीगिरी करून बुरखे द्यावेत अथवा त्या मुलींचे धर्मांतर करावे.
- कॉलेजात जो प्रकार लिहिला आहे. तिथे अंबट शौकिनांचा बंदोबस्त करावा. अथवा परत धर्मांतराचा पर्याय आहेच. शेवटी ज्याज्या धर्मात जे जे चांगले आहे ते धर्मनिरपेक्ष भारतात मान्य आणि स्वीकारण्यास कोणाची बंदी नाहीच.
- विषयाचा सुवर्ण मध्य काढायचा असेल तर तोडगा मान्य करा नाहीतर चर्चा बंद करा. उगाच निरर्थक लिहित बसू नका.