पु. ल. देशपांड्यांच्या कथा कॅसेटवर सहज उपलब्ध आहेत, आणि त्या सर्वांना आवडतात हे खरेच आहे.
चिं. वि. जोश्यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊ ह्यांच्या कथाही मुलांना सहज आवडण्यासारख्या आणि गोडी लावतील अशा आहेत. बहुधा सध्या ती पुस्तके मुद्रणबाह्य असावीत. तरीही ग्रंथालयातून आणून आपल्या घरातल्या मंडळींच्या आवाजात जर आपण ती कॅसेटवर ध्वनिमुद्रित करून मुलांना ऐकवीत राहिलो तर त्यांचीही आवड लागेल असे वाटते. (मी हा प्रयोग पूर्वी घरगुती स्तरावर एका वेगळ्या कथेच्या बाबतीत करून पाहिलेला आहे.)