खरे तर या विषयावर मी १३ अप्रिल २००८ ला एक कविता केली होती.

खालीलप्रमाणेः

वल्कले नेसून तरुणी हिंडती रस्त्यामधे
चूक पुरुषांचीच, त्यांची चूक नाही यामधे

भूमिका बदलून यांच्या वागती वस्तू जरा
ओढणी सोडून जागा, येतसे हातामध्ये

वाहनांवर मांड टाकी चेहरा झाकून त्या
बसवती शरिरास बाकी तोकड्या कपड्यांमध्ये

'मान खाली घाल' म्हणती, मर्दही ओशाळले
लाजवी पुरुषांस असल्या हिम्मती डोळ्यामध्ये

काहि ना वाईट जोवर काहि ना वाईट हो
जाहले तर, दोष आहे या जगाचा त्यामधे