आपण विनाकारण काथ्याकुट करुन काहिही निष्पन्न होणार नाही सबब हि चर्चा बासनात गुंडाळून ठेवावी हे उचित. कारणः

हि चर्चा सुभाष गोयल (झी समुहाचे सर्वे सर्वा) वाचणार नाहित. तसेच झी समुहाचे इतर अधिकारिही दुर्लक्षच करणार आहेत. तसेच कुठलिही स्पर्धा हि त्यांच्या परीक्षकांच्या निर्णयावरच टरते. मनोगत किन्वा मनोगती हे काही परिक्षकांचे  परीक्षक नाहित किन्वा प्राईसवाटर  सारखे लेखा परीक्षक नाहित. कशाला नसत्या उठाठेवि. लहान बालकांचे कोडकौतिक झाले बस इतकेचि.

प्रींट आणि ईलेक्ट्रोनिक माध्यमे यामध्ये आजकाल हा फार मोठा दोष शिरला आहे कि तेच परीक्षक असल्याचा दावा करतात. त्यात पुन्हा लोकप्रियता हि मिळवून त्याचा गैर वाजवी फायदाही करून घेतात. आग्रा येथिल वाजपेयी - मुशारर्फ बातचित केवळ मिडियाच्या अतिरेकानेच निष्फळ ठरलि. अखेर दोन नेते आपाप्सात बसून जे काही ठरवतिल ते जनसामान्याना पोचविणे असे त्यांचे कामाचे स्वरुप असुनही त्यांचा अजेंडा काय असावा इ. बाष्कळ व वांझोटी चर्चा आदी करून सगळा सत्यानाश घडवून आणला खरे तर तेव्हापासुनच मिडियाला लगाम कसून ठेवायला पाहिजे होते.