तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला माझी मजा आली मला याची मजा आली
इथे नाहीस तू माहीत आहे पण मनासाठी
जरा हाका तुला मारून जातो खालच्याखाली
रडावे बालकाने, केस कापावे हजामाने
तशी ही जिंदगी म्हणते, चला झाली, चला झाली.... अप्रतिम.!
फक्त शेवटच्या द्विपदीत...
'मोडता घाली' हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाहीये, (अर्थात हे माझं मत)
'मोडते घाली ' असे बरोबर वाटते. (मोडतं घालणे असा श्ब्दप्रयोग ऐकल्यासारखा वाटतो, म्हणून)
बाकी कविता आवडली .