कार्तिकीचे गायन चांगले असले तरी पहिल्या क्रमांकासाठी आर्या, प्रथमेश किंवा रोहित हेच अधिक योग्य दावेदार होते.
प्रींट आणि ईलेक्ट्रोनिक माध्यमे यामध्ये आजकाल हा फार मोठा दोष शिरला आहे कि तेच परीक्षक असल्याचा दावा करतात.
आर्या, प्रथमेश किंवा रोहित यांच्यापैकी कोण अधिक योग्य यावर प्रतिसादकाचे ठाम मत नाही. (दावेदार हा शब्द मराठीत शत्रू, दुष्ट, खुनशी अशा अर्थानेच वापरतात, हक्कदार किंवा मागणीदार अशा अर्थाने नाही! तसा वापरून मराठीत अनिष्ट प्रथा पाडू नयेत. हे पाचहीजण एकमेकांचे शत्रू नव्हते.) कार्तिकीच्या सर्वोत्कृष्टपणाबद्दल मात्र परीक्षक आणि पंच यांचे यांचे एकमत किंवा बहुमत होते. परीक्षक आणि पंच ह्यांचे संगीताचे ज्ञान आपल्यापेक्षा शेकडो पटीने वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या निकालावर भाष्य करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.
प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, किवा सुभाषचन्द्र गोयल यांचा उद्धार करायचे इथे काहीही कारण नाही. त्यांनी आपण परीक्षक आहोत, असे दूरान्वयानेदेखील सूचित केलेले दिसले नाही. निकाल पसंत नसेल तर परीक्षक आणि पंचांच्या लायकीबद्दल चर्चा करावी.