तुम्ही लिहिलेले मुद्दे हे पटण्यासारखे आहेत. त्याशिवाय एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्तिकीचा आवाजाचा वेगळेपणा! ती खुल्या आवाजात गाऊ शकते आणि ते सुद्धा सुरेल! सूर, ताल, यापलिकडे जाऊन एक ह्रदयाला भिडणारा असा एक आवाजाचा प्रकार आहे, त्याची बीजे मला कार्तिकीच्या आजच्या कोवळ्या आवाजात दिसतात.